सुस्वागतम

DS EDUTECH या शैक्षणिक ब्लॉगवर आपले स्वागत आहे , देवराव जाधव ९४०४३६४५०९ .
दैनंदिन अभ्यासमाला दिनांक ऑक्टोबर २०२२ पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .
Online अभ्यास दिनांक 31 मार्च पर्यंत डाउनलोडसाठी उपलब्ध , डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा .

HAPPY NEW YEAR 2024

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

विजयादशमी | दसरा | Vijayadashami | Dasara

 विजयादशमी | दसरा | Vijayadashami | Dasara 

विजयादशमी | दसरा | Vijayadashami | Dasara

विजयादशमी हा भारत आणि नेपाळमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या शेवटी साजरा केला जाणारा एक प्रमुख हिंदू सण आहे. याला 'दसरा', 'दशहरा' किंवा 'दशैन' या नावानेही ओळखले जाते. हा सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे आश्विन महिन्याच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. आश्विन महिना हा हिंदू सौर दिनदर्शिकेतील सातवा महिना असतो, जो सामान्यतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर या ग्रेगोरियन महिन्यांत येतो. विजयादशमी म्हणजेच आश्विन शुद्ध दशमी हा दिवस भारतीय संस्कृतीत महत्त्वाचा मानला जातो. देवीच्या घटांची स्थापना आश्विन शुद्ध प्रतिपदेला केल्यानंतर देवीचे नवरात्र साजरे होते.
विजयादशमी वेगवेगळ्या कारणांसाठी साजरी केली जाते आणि भारतीय उपखंडातील नेपाळी आणि भारतातील विविध प्रांतात वेगवेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. भारताच्या दक्षिणेकडील, पूर्वेकडील, ईशान्येकडील आणि काही उत्तरेकडील राज्यांमध्ये, विजयादशमीला दुर्गापूजेची समाप्ती होते. या दिवशी देवी दुर्गाने महिषासुर या म्हशीच्या राक्षसावर विजय मिळवून धर्माचे रक्षण केले होते. उत्तर, मध्य आणि पश्चिम राज्यांमध्ये, या सणाला दसरा म्हणतात (तसेच याला दशहरा देखील म्हणतात). या प्रदेशांमध्ये, या सणाला रामलीलाची समाप्ती होते आणि देव रामाने रावणावर केलेल्या विजयाचे स्मरण केले जाते. वैकल्पिकरित्या, हा सण दुर्गा किंवा सरस्वती सारख्या देवीच्या विविध पैलूंबद्दल आदर दर्शवतो.
विजयादशमीच्या उत्सवात नदी किंवा महासागराच्या समोर मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत देवी दुर्गा, लक्ष्मी, सरस्वती, गणेश आणि कार्तिकेय यांच्या मातीच्या मूर्ती संगीत आणि मंत्रांसह घेऊन जातात. त्यानंतर या मूर्ती पाण्यात विसर्जित केल्या जातात. इतरत्र, दसऱ्याच्या दिवशी, वाईटाचे प्रतीक असलेल्या रावणाच्या भव्य पुतळ्यांना फटाक्यांसह जाळले जाते. हे रावणदहन वाईटाचा नाश असल्याचे प्रतीक मानले जाते. विजयादशमीनंतर वीस दिवसांनी साजरा होणाऱ्या दिवाळीची तयारीही या सणातून सुरू होते. दिवाळी हा दिव्यांचा महत्त्वाचा हिंदू सण आहे.

दसरा

विद्येची देवता मानल्या गेलेल्या सरस्वती देवीचे पूजन या दसऱ्याच्या दिवशी विशेषत्वाने केले जाते. याच दिवशी अपराजिता देवीची पूजा करतात. दसऱ्याच्या दिवशी गावाच्या सीमा ओलांडून जाण्याची प्रथा प्रचलित आहे. लोक या दिवशी परस्परांनासोने म्हणून आपट्याची पाने देतात. सायंकाळी गावाची सीमा ओलांडून ईशान्येस जायचे, शमीच्या किंवा आपट्याच्या झाडाची पूजा करायची, तेथे अष्टदल रेखाटून त्यावर अपराजिता देवीची स्थापना करावयाची आणि तिला प्रार्थना करावयाची की, मला विजयी कर. त्यानंतर योद्ध्यांनी शस्त्र पूजन, व्यापाऱ्यांनी व्यापारासाठी प्रयाण व विद्यार्थ्यांनी सरस्वतीपूजन करायचे अशी प्रथा होती. मुले पाटीवर सरस्वतीचे प्रतीकात्मक चित्र काढून त्या पाटीची पूजा करतात. पुस्तकांची आणि वह्यांचीही पूजा होते.

प्रारंभी हा एक कृ़षिविषयक लोकोत्सव होता. पेरलेल्या शेतातील पहिले पीक यावेळी घरात येई, त्यावेळी शेतकरी हा उत्सव करीत असत. ग्रामीण भागात शेतातील धान्याचा तुरा आपल्या फेट्यात लावण्याची पद्धतीही प्रचलित आहे. काही लोक ते कानांवर खोचतात तर काही टोपीवर लावतात.

साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानल्या गेलेल्या विजयादशमीला एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करतात. नवी वाहने, वास्तू तसेच कपड्यांची खरेदी, सोन्याची खरेदी होते.

भारतातील विविध प्रांतांतील दसरा


उत्तर भारत

उत्तर भारतात हिमालयाच्या कुशीत कुलू घाटीत दसऱ्याचा उत्सव सात दिवस साजरा होतो. यावेळी रघुनाथाची यात्रा केली जाते. रामलीला सादरीकरण हा नवरात्रीतील नाट्यविशेष उत्तर भारतात प्रचलित आहे. नऊ दिवस चालूं असलेल्या रामलीला नाटिकेची सांगता विजयादशमीला रावणवधाने केली जाते. यावेळी रावणाचा मोठा पुतळा उभारून त्याचे दहन करतात.कुलू शहरातला दसरा विशेष असतो. या दिवशी मिरवणुकीची सुरुवात रघुनाथजी यांच्या पूजनाने केली जाते.

गुजरात
सोमनाथ आणि द्वारका येथे दसरा साजरा होतो. दसऱ्याला जुनागड संस्थानातील देवीची ब्राह्मण पुरोहिताच्या हस्ते पूजा केली जाते.

छत्तीसगड
छत्तीसगडमधील बस्तर या ठिकाणी साधारण अडीच महिने दसरा साजरा होतो. हा उत्सव दंतेश्वरी या देवतेचा उत्सव मानला जातो. रामाने रावणावर मिळविलेला विजय याला या भागात महत्त्व दिले जाते.

महाराष्ट्र

महाराष्ट्रात कातकरी आदिवासी स्त्रिया या दिवशी विशिष्ट नाच करतात. त्याला दसरा नृत्य असे म्हणतात.तसेच बंजारा समाजातील लोक शस्त्रपूजा व शेतीतील लोखंडी अवजारांची पूजा करतात.

घराला आंब्याच्या पानांचे आणि झेंडूच्या फुलांचे तोरण लावतात. दसऱ्याला झेंडूच्या फुलांनी पूजा करण्याची प्रथा आहे. यंत्रे, वाहने यांना झेंडूच्या फुलांच्या माळा घालतात.

पंजाब-
पंजाबमध्ये दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करतात. लोक परस्परांना मिठाई भेट देतात.

दक्षिण भारत
आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक येथे नऊ दिवसात दर तीन दिवशी देवीच्या एकेका रूपाची पूजा केली जाते. पहिले तीन दिवस लक्ष्मी, नंतरचे तीन सरस्वती आणि शेवटचे तीन दिवस दुर्गेची पूजा केली जाते. धन धान्य, कला, शिक्षण आणि शक्ती यांची ही उपासना असते. लोक एकमेकाना मिठाई आणि वस्तू भेट देतात. म्हैसूर येथील दसरा आणि मिरवणूक ही जगभरात प्रसिद्ध आहे.

आंध्रप्रदेश
आंध्र प्रदेश येथील विजयवाडा येथील इंद्रकिलाद्री पर्वतावर कनकदुर्गा मंदिर आहे. येथे शारदीय नवरात्र उत्सव साजरा केला जातो. त्याजोडीने दसऱ्याच्या दिवशी देवीला हंसाच्या आकाराच्या होडीत बसवून कृष्णा नदीमध्ये फिरवून आणले जाते याला थेपोत्सवम असे म्हणले जाते तसेच मंदिरात आयुध पूजाही होते.

स्त्रोत : google 

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

नवरात्र उत्सव , घटस्थापना

नवरात्र उत्सव , घटस्थापना  

नवरात्र उत्सव , घटस्थापना

नवरात्र उत्सव , घटस्थापना


नवरात्रोत्सव हा शक्ती उपासनेचा उत्सव आहे. शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापना केली जाते, कलश स्थापनेचे विशेष महत्त्व मानले जाते. कलश स्थापनेचा अर्थ असा आहे की त्या दिवशी आपण देवी दुर्गा मातेच्या प्रकाशस्वरूपाची पूजा करण्यासाठी घर, मंदिर आणि पंडालमध्ये घटस्थापना करतात.

हिंदू धर्मात नवरात्रोत्सव खूप खास मानला जातो, शारदीय नवरात्री  शारदीय नवरात्रोत्सव अश्विन महिन्यात साजरा केला जातो, ज्यामध्ये 9 दिवस देवी दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते. कलश स्थापना म्हणजेच घटस्थापना देखील नवरात्रीच्या काळात विशेष महत्व मानली जाते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते, हा एक विशेष विधी आहे. ते योग्य मुहूर्तावर स्थापित करणे फार महत्वाचे आहे. घटस्थापनेसाठी स्वच्छ माती, मातीचे भांडे, सात प्रकारची धान्ये, लहान मातीचा किंवा पितळी कलश, गंगाजल, मौली धागा, अत्तर, सुपारी, कलशात ठेवण्यासाठी नाणे,  ५ आंब्याचे पानं, अक्षत, नारळ, लाल कापड, झेंडूची फुले आणि दुर्वा आवश्यक आहे.


घटस्थापना कशी करावी

कलशाची स्थापना करण्यासाठी मातीच्या भांड्यात माती टाकावे, त्यात सात प्रकारचे धान्य टाकावे व मातीचे तीन थर करावेत. कलशात गंगाजल भरून त्याला मौली धागा बांधावा. या पाण्यात सुपारी, अक्षत आणि नाणे टाकल्यानंतर कलशाच्या काठावर 5 आंबे किंवा अशोकाची पाने ठेवावीत, त्यानंतर नारळावर लाल कपडा बांधून कलशावर ठेवावा आणि कलश गुंडाळावा. हा कलश माता दुर्गेच्या पूजेसाठी स्थापित करावा, पूजेनंतर तो नऊ दिवस त्यांच्यासमोर ठेवावा.

पूजा करण्यासाठी शुभ वेळ

नवरात्रोत्सव हा शक्ती उपासनेचा उत्सव आहे. शारदीय नवरात्रीमध्ये कलश स्थापना केली जाते, कलश स्थापनेचे विशेष महत्त्व मानले जाते. कलश स्थापनेचा अर्थ असा आहे की त्या दिवशी आपण देवी दुर्गा मातेच्या प्रकाशस्वरूपाची पूजा करण्यासाठी घर, मंदिर आणि पंडालमध्ये घटस्थापना करतात. कलशस्थानाचा शुभ काळ प्रतिपदा तिथीच्या सूर्योदयापासून सुरू होतो, परंतु मंदिर आणि पंडाल आपापल्या व्यवस्थेनुसार या घटस्थानाची पूजा करतात. अनेक ठिकाणी देवीच्या मंदिरात घटस्थापनाच्या अभिजीत मुहूर्तावर सकाळी 11:36 ते दुपारी 12:24 या वेळेत पूजा सुरू होते. यावेळी पुजारी सामुहीक पद्धतीनं पुजा करतात. या शुभ मुहूर्तावर सर्वजण पूजा कक्षात जातात आणि विधीनुसार पूजा सुरू करतात. याशिवाय अखंड ज्योत देखील प्रज्वलित केली जाते.

भारतीय सण

स्त्रोत : Google 

गुरुवार, ७ मार्च, २०२४

महाशिवरात्र

 

महाशिवरात्र

महाशिवरात्र 

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते. मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात, भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात. उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो, तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.


प्राचीनता आणि महत्त्व


महाशिवरात्रीनिमित्त चक्क्याची विशेष पूजा
संस्कृत पुराण साहित्यापैकी अग्नी पुराण, शिव पुराण, पद्म पुराण या ग्रंथांमध्ये महाशिवरात्री व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी बेलाची पाने वाहून शिवाची पूजा करावी असे या व्रताचे स्वरूप आहे.

आख्यायिका

महाशिवरात्रीला भगवान शंकराने तांडवनृत्य केले अशीही एक आख्यायिका प्रचलित आहे.
एक शिकारी होता. तो शिकार करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालवीत असे. एके रात्री तो शिकारीला गेला आणि झाडावर चढून बसला. ते झाड बेलाचे होते आणि त्याखाली शिवलिंग होते. सावज नीट दिसावे म्हणून शिकारी झाडाची पाने खुडून खाली टाकू लागला. नेमकी ती बेलाची पाने त्याच्या नकळत खालच्या शिवलिंगावर पडत राहिली. पहाटे एक हरीण तिथे आले. शिकारी त्यावर बाण मारणार तोवर हरीण म्हणाले मी माझ्या कुटुंबाला भेटून येतो.त्यानंतर हरणाचे सर्व कुटुंब तिथे आले आणि सगळीच म्हणू लागली- "मला मार पण इतराना सोडून दे." हे पाहून त्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या कुटुंबाला निघून जाऊ दिले आणि नंतर त्याने शिकार करणे सोडून दिले. त्याच्या नकळत त्याला त्या रात्री उपवास घडला, पूजा झाली आणि व्रत झाले त्यामुळे तो पावन झाला. हा व्याध आजही आकाशात दिसून येतो असे मानले जाते.

पूजापद्धती

महाशिवरात्रीला शिवलिंगाची विशेष पूजा होते. पंचगव्य म्हणजे गायीचे दूध, तूप, शेण, गोमूत्र आणि दही लावून शिवलिंगाला अभिषेक करतात. त्यानंतर दूध, दही, तूप, मध आणि साखर या पंचामृताने शिवलिंगावर लेप देतात. त्यानंतर धोत्रा आणि बेलाची पाने तसेच पांढरी फुले वाहून पूजा करतात.[१२] शिवलिंगावर चक्का थापण्याची प्रथा महाराष्ट्रात आहे.

उपवास-
महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविक उपवास करतात. काही भक्त दूध आणि फळे असा आहार घेतात. प्रसादासाठी विविध प्रकारचे पदार्थ तयार करून ते शंकराला अर्पण केले जातात. खीर, पंचामृत, दूध आणि दुधापासून केलेले पदार्थ नैवेद्यासाठी तयार केले जातात.

शिवरात्रीच्या रात्री काही प्रांतात भाविक दुधामध्ये भांग मिसळून त्याचे सेवन करतात. दुधामध्ये सुकामेवा वाटून घालतात आणि ते मसाला दूध पिण्याची पद्धतीही प्रचलित आहे. याला थंडाई असे म्हटले जाते.

महाशिवरात्री पूजेसाठी आवश्यक अशी सामग्री दुकानांमध्ये भाविकांसाठी उपलब्ध करून दिली जाते. भस्म, रुद्राक्ष, रुद्राक्षमाला, त्रिशूल, शंकराच्या मूर्ती, शिवलिंगे, डमरू अशा विविध गोष्टी विक्रीसाठी उपलब्ध असतात. बेलाची पाने, पांढरी फुले, हार यांचीही विक्री या दिवशी केला जाते.

भारताच्या विविध राज्यात
दक्षिण भारत-
दक्षिण भारतात आदल्या दिवशी एकभुक्त व्रत केले जाते. म्हणजे आदल्या दिवशी एक भोजन केले जाते. रात्री पवित्र जागी झोप घेतली जाते. नदीत स्नान करून शंकराचे दर्शन घेतले जाते. शिवाला कमल अर्पण करून तांदुळाच्या खिरीचा नैवेद्य दाखविला जातो. ऋग्वेदातील सूक्ते म्हटली जातात. तुळशीची पाने आणि पायसाचा (खिरीचा) नैवेद्य आणि यजुर्वेदाचे पठण, बेलाची पाने आणि तीळ घातलेला भाताचा नैवेद्य आणि सामवेदाचे पठण, निळी कमळे वाहून साध्या अन्नाचा नैवेद्य आणि अथर्ववेदाचे पठण केले जाते.

काश्मीर-
काश्मीरमध्ये महाशिवरात्री दरम्यान होणारी बर्फवृष्टी ही पवित्र मानली जाते. शंकराचार्य टेकडी येथील मंदिरात भक्त दिवसभर दर्शनासाठी जातात. विशेष यात्रेचे आयोजन केले जाते. पूजेचे पदार्थ, अक्रोड, कमळाची फुले यांची विक्री करणारी दुकाने मंदिर परिसरात थाटली जातात.

ईशान्य भारत-
आसाम राज्यातील शुक्रेश्वर मंदिर, उमानंद मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीला भाविक दर्शनासाठी भेट देतात. यात्रेचे आयोजन करण्यात येते.

ओरिसा-
ओरिसा राज्यात भाविक शिवरात्रीचा उपवास करतात आणि शिव मंदिरात जाऊन दर्शन घेतात.

उत्तर प्रदेश-
उत्तर प्रदेशातील वटेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त भाविक राजस्थान, मध्य प्रदेश येथून पाण्याची कावड घेऊन पोहोचतात आणि शिवाला अभिषेक करतात. मध्य हिमालयात या दिवशी यात्रा भरते.

इतर भारतीय सणांचे महत्व पहा -
👇👇👇👇👇👇

सौजन्य : विकिपीडिया